नंदूरबार l प्रतिनिधी
श्री. स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु . कॉलेज नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी स्केटींग स्पर्धेत उंच भरारी घेतली आहे .
नंदुरबार जिल्हा हौसी रोलर स्केटिंग असोसिएशन व्दारा आयोजित ओपन स्केटिंग चैम्पीयनशीप 2022. या स्पर्धेसाठी अनेक शाळेच्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . यात शाळेतील जवळ जवळ 26 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रथम व व्दितीय क्रमांक मिळवीत शाळेचे नावलौकीक केले आहे .
शाळेच्या प्राचार्य यांनी त्या विजयी विद्यार्थ्यांना सम्मानपत्र व पदक देऊन गौरवीण्यात आले . या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे मनभरुन कौतुक संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणी , व्हा . चेअरमन सिध्दार्थ वाणी यांनी केले . शाळेतील स्केटिंग प्र शिक्षक निशांत जगताप यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले .