नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा ते धडगाव रस्त्यावरील दरा फाट्याजवळ दुचाकींच्या झालेल्या धडकेत तीन जण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील धावलघाट येथील सचिन राजाराम पावरा (वय २१, रा.धावलघाट ता.धडगाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने (क्र.एम.एच.१८ एल ८२३९) बसवून शहादा ते धडगाव रस्त्याने जात होता.
यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून एका हाताने विडी पित एका हाताने दुचाकी चालवीत असताना दरा फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या उदेसिंग पावरा यांच्या दुचाकीला (क्र.जी.जे.१९ एन १५९९) धडक दिल्याने
घडला. घडलेल्या सचिन पावरा, उदेसिंग होमा पावरा यांचे निधन झाले.
तसेच दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. एक जण गंभीर जखमी झाला होता.त्याला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला.याबाबत खारसिंग दारासिंग ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात मयत सचिन पावरा याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत








