नंदूरबार l प्रतिनिधी
मोटार सायकल चोरी रोखण्याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते म्हणून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतुन मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत .
त्यामुळे पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आवाहन होते . त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर तसेच विना नंबर प्लेट असलेले वाहन , विना कागदपत्र असलेल्या वाहन धारकांविरुध्द् विशेष मोहिम राबविणेबाबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी निर्देश दिले आहे .त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विना नंबर प्लेट असलेले वाहन , विना कागदपत्र असलेले वाहन धारकांविरुध्द् विशेष मोहिम वाहतूक पोलीसांमार्फत राबविण्यात येणार आहे .
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , वाहन चालवितांना वाहनावर RTO रजिस्ट्रेशन नंबर लावून व सोबत वाहनाचे कागदपत्र सोबत घेवूनच वाहन चालवावे . विना नंबर प्लेट असलेले वाहन , विना कागदपत्र असलेले वाहन चालवितांना कोणीही आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .








