नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील बिलाडी ते नारायणपूर रस्त्यावर एका 25 ते 30 वयाच्य तरुणीचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे .या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील बिलाडी- नारायणपूर रस्त्यावर आज दि.26 ऑगस्ट रोजी दुपारी एका अंदाजे 25 ते 30 वयाच्या अनोळखी तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली . या ठिकाणी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून ,नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर , शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत . या घटनेचा तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे .