नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती क.पु.पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एप्रिल 2021 मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
परीक्षेस एकूण 15 विद्यार्थी प्रवेशित होते यात
नंदुरबार जिल्ह्यातून ओबीसी संवर्गातून पियुष आनंदा पाटील याचा जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक गुणवत्ता यादीत आला आहे.तसेच ओबीसी संवर्गातून हर्षदा गव्हरलाल पाटील हिचा आठवा क्रमांक आला असून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष ,उपाध्यक्ष ,संचालक मंडळ विद्यालयाच्या प्राचार्य सौ. विद्या चव्हाण ,पर्यवेक्षक ,शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले.