नंदुरबार l
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे गुणवंत संस्थाचालक गौरव पुरस्कार,शिक्षक पुरस्कार व शिक्षकेतर पुरस्काराचे वितरण भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती मनीषा खत्री जिल्हाधिकारी,नंदुरबार नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, परीक्षीत मोडक,हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका वंदना रविंद्र चौधरी मेंबरशिप चेअरमन, निलेश तवर असिस्टंट गव्हर्नर, शब्बीरभाई मेमन, डॉ.विशाल चौधरी अध्यक्ष,अनिल शर्मा सचिव,किरण दाभाडे उपस्थित होते.
*पुरस्कार वितरणानंतर मनीषा खत्री यांनी आपल्या मनोगतातून “पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते”. या भावनेतून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे महनीय काम समाज,पालकापर्यंत पोहोचण्यासाठी भविष्यात गुणवंत शिक्षक पुरस्काराची मोठ्या प्रमाणात व्याप्ती देऊन सामान्यांपर्यंत शिक्षकाचे कार्य,महती पोहोचवण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या पदाधिकाऱ्यांना केले. तसेच पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन केले.
परीक्षित मोडक यांनी आपल्या मनोगतातून आमची संस्था स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातील असून शिक्षणाचे अविरत कार्य आजही अखंड सुरू आहे. संस्थाचालकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम कार्य करण्याचे आवाहन संस्था चालकांना केले.
2 संस्थाचालक,12 शिक्षक,1 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुणगौरव मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांपैकी हिम्मतराव चव्हाण व भारती रनाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे हॅप्पी स्कूल चेअरमन,नागसेन पेंढारकर,लिटरसी चेअरमन,सय्यद ईसरार अली,प्रोजेक्ट चेअरमन मनोज गायकवाड व्हा. चेअरमन डी.डी. साळुंके,प्रा.राहुल मेघे,विशाखा तोष्णीवाल, फकरुदी्न जळगांववाला,राकेश आव्हाड,फैयाज खान, विजय बडगुजर, प्रवीण पाटील,राहुल पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी. साळुंके,सूत्रसंचालन किरण दाभाडे तसेच आभार प्रदर्शन मनोज गायकवाड यांनी केले.








