नंदुरबार l
नवापूर शहरातील देवळफळी जवळील एका समाधीस्थळाजवळून चोरट्याने चंदनाची झाडे चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील देवळफळी जवळील बाबा गुरुजी समाधीस्थळाजवळ असलेली २० हजार रुपये किंमतीची चंदनाची झाडे चोरट्याने चोरुन नेली. याबाबत धर्मेशभाई जितेंद्रभाई पटेल यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रतापसिंग वसावे करीत आहेत.








