नंदूरबार l प्रतिनिधी
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह पंधरवाडा अंतर्गत आज शहरातील बस स्थानक येथे भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहरातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका संगीता सोनवणे, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, भटके विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष संजय साठे,
शहर सरचिटणीस कैलास भावसार, शहर कोषाध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ काजल मच्छले, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुरैया खाटीक, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सौ रेखा चौधरी आदी उपस्थित होते.








