नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भालेर येथे आदिवासी विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार व शासकीय आश्रम शाळा मुख्याध्यापक संघ प्रकल्प नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरव गुरुजनांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
नंदुरबार प्रकल्पातील नवापूर,नंदुरबार, शहादा तालुक्यातील 32 शासकीय आश्रम शाळा अंतर्गत शाळेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची निवड करत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते देण्यात आला.
नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथील मानधन तत्वावर अध्यापन करणारे महेश यशवंत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
महेश पाटील पत्रकार असून रोजंदारी कृती समितीचे राज्याचे प्रमुख आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याने सर्व क्षेत्रातून त्यांचे कौतुक केले जात आहे.नातेवाईक व मित्रपरिवाराने देखील त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
नंदुरबार प्रकल्प अंतर्गत मुख्याध्यापक संघाने चांगला उपक्रम राबविल्याने प्रकल्पधिकारी मीनल करणवाल यांनी मुख्याध्यापक संघाचे कौतुक केले. तर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.








