नंदुरबार l
नंदुरबार ते करजकुपा रस्त्यावर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने बाप-लेकीला दुखापत झाली असून याप्रकरणी वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, निझर तालुक्यातील वेलदा येथील हरी सोमजी पाडवी व त्यांची मुलगी सुनिता पाडवी दोघेजण दुचाकीने (क्र.जी.जे.२६ पी ५१०६) नंदुरबार ते करजकुपा रस्त्याने जात होते. यावेळी एका चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.१८ बीसी ८१८४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून भरवाड लोकांच्या म्हशींच्या गोठ्याजवळील रस्त्यावर दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात हरी पाडवी व सुनिता पाडवी यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत हरी पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.कैलास मोरे करीत आहेत.








