नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील हुंडा-रोषमाळ येथे आदिवासी समाजात पसरत चाललेली व्यसनाधीनता कमी करण्यासाठी व्यसनमुक्तीवर आधारित गीताचे चित्रीकरण करण्यात आले.विशेष म्हणजे व्यसनाधीनता कमी करण्यासाठी गीताच्या माध्यमातून तीन राज्यातील कलाकार एकत्र आले.

आदिवासी समाजात पसरत चाललेली व्यसनाधीनता,युवकांचा टोळ्या ह्यांमुळे ऐन तरुणवयात वाट चुकविणे,शिक्षणापासून दूर होऊन गैरकृत्यात अडकणे,परिणामी बेरोजगारी अशिक्षितपणा आणि कुपोषण ह्यासारख्या गंभीर समस्यांचा विळख्यात पडणाऱ्या नवतरूणाईसाठी एक गाण्याचा माध्यमातून एक संदेश म्हणून ॲड. सुभाष वळवी यांच्या प्रयत्नातून तिन्ही राज्याचा विविध भागात आपल्या अभिनयाने लोकांचा मनात घर करून असलेल्या कलाकारांचा सहप्रयत्नाने एक गाण्याचा माध्यमातून व्यसनमुक्ती संदेश हा संकल्प पुढे ठेवत गीताची निर्मिती करण्यात आली,ज्यांचे लिखाणकाम व गीतरचना स्वतः ॲड.सुभाष वळवी ह्यांनी केलेले आहे,आणि संगीतबद्ध मध्य प्रदेशातील उत्कृष्ट संगीतकार म्हणून ओळख असलेले आदिवासींचे प्रसिद्ध गायक संजय किराडे ह्यांचे चिरंजीव रितेश किराडे ह्यांनी केलेले आहे तर गायक म्हणून भगदरी येथील पार्श्वगायक विश्वनाथ पाडवी व सहगायिका म्हणून धानोऱ्याचे पल्लवी वसावे ह्यांनी काम केलेले आहे.

मागील महिन्यापासून सदर गीताची चित्रीकरण प्रस्तावित होते,परंतु पावसाअभावी चित्रीकरणास करण्यात विलंब झाला. या गीतात मुख्य अभिनय चा रूपाने गुजरात मधील अभिनेते तरुण वसावा तर अभिनेत्री म्हणून सारू वसावा ह्यांनी काम केलेले आहे तर छोट्या पळदयावरचा अनेक कलाकारांना जागा देण्यात आली आहे.चित्रीकरणाचा प्रारंभी हुंडा-रोषमाळ गावकाऱ्यांचा हस्ते जंगी स्वागत करत उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी नर्मदा विकास परिसर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबूलाल पावरा यांनी प्रास्ताविक करीत कलाकारांना शुभेच्छा दिल्या सलग तीन दिवस रात्र दिवस चालणारे चित्रीकरण व्यवस्थित पार पाडण्यासाठी गावकऱ्यांचे खास सहकार्य विशेष ठरले समारोप कार्यक्रमाअंती गीतकार/कवी व सदर गीताचे निर्माते सुभाष वळवी ह्यांचे भावनिक बोल गावकऱ्यांची मने जिंकून घेणारे ठरले. लवकरच सदर गीत रिलीज करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मत सुभाष वळवी ह्यांनी व्यक्त केले.व आभारप्रदर्शन बाबूलाल पावरा केले.








