नंदुरबार l
येथील श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे आज दि.८ सप्टेंबर गुरुवार रोजी श्री सत्यनारायण कथा, महाआरती तसेच ५६ भोग महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
येथील सोनार गल्ली, टिळक रोड श्रीमंत बाबा गणपती मंडळात आज दि.८ सप्टेंबर २०२२ गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता श्री सत्यनारायण कथा, साडेसात वाजता महाप्रसाद नैवैद्य (५६ भोग) तसेच रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे.
वरील कार्यक्रमात ज्या भाविकांना नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी शिवम ज्ञानेश्वर सोनार (९५६१५५१७२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष आशिष जळगांवकर यांनी केले आहे.








