नंदूरबार l प्रतिनिधी
गणेश उत्सव ते दिवाळीपर्यंत सणासुदीच्या काळात मिठाई व फरसाणची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. दरम्यान अनेक दुकान मालक नागरिकांच्या आरोग्याला नुकसान होईल असे पदार्थ बनवून विक्री केले जात असल्याने. नंदुरबार अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरू आहे.
नंदुरबार शहरातील बिकानेर स्वीट मार्ट, हॉटेल राजस्थान या ठिकाणाहून अन्नाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

तर शहादा शहरात अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या मे फ्रायो फुड्स या पेढीला भेट देऊन अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. त्यात २ लाख २४ हजार रुपये किमतीचे नमकीन व शेवसाठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी पवार, सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या पथकाने केली आहे. तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अन्नाचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.








