शहादा l
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात दि.5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करून बॉटनी क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त बॉटनी क्लबच्या विद्यार्थी सदस्यांनी महाविद्यालय परिसरातील शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरव केला. बॉटनी क्लब उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आणि डीबिटी स्टार कॉलेज योजनेअंतर्गत व्यख्यानमालेसाठी वक्ते म्हणून एस. एस. व्ही. पी. एस. विज्ञान महाविद्यालय धुळे येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. डी. ए. पाटील हे उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील होते.
या कार्यक्रमासाठी शहादा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, माजी सभासद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बॉटनी क्लब समन्वयक प्रा. महेश जगताप यांनी बॉटनी क्लब अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख सर्वांना करून दिली.
प्रा. डॉ. एस. के. तायडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले आणि प्रमुख अतिथींची ओळख सभागृहाला करून दिली. कु. गायत्री पाटील (एम. एस्सी. बॉटनी) हिने शिक्षक दिनानिमित्त भाषण केले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. डी. ए. पाटील यांनी एथनोबॉटनी या विषयावर बोलतांना वनस्पतीशास्त्राची भारतीय इतिहासातील नोंदींवर प्रकाश टाकला. वनस्पतिशास्त्र विषयातील गमती जमती सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ.पाटील यांच्याशी विविध प्रश्न मांडून हितगुज केली.अध्यक्षीय मनोगत मांडतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांनी, रुसा योजना आणि डीबी स्टार कॉलेज योजनेसंदर्भात अतिथींना माहिती दिली तसेच वनस्पतीशास्त्र विभागाचे आणि बॉटनी क्लबचे महाविद्यालयासाठी असलेले योगदान सर्वांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गितांजली पाटील (एम.एस्सी बॉटनी) हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॉटनी क्लबचे आजी माजी विद्यार्थी सदस्य, प्रा. निलेश आठवले, डॉ. सुनील पाठक, प्रा. विजया पाटील, प्रा. केशव कोळी, शिक्षकेतर कर्मचारी अशोक पाटील, गणेश पाटील आणि राहुल बागले यांनी परिश्रम घेतले.
बॉटनी क्लबच्या या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक मा. प्रा. मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पटेल आणि प्रा. डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी कौतुक केले.








