तळोदा l
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक मा.भगवान जगटाळे (सहआयुक्त नियोजन) यांना निवेदन देण्यात आले तसेच मा. भगतसिंग कोश्यारी राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मुख्य सचिव मुंबई यांना ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद केले आहे की,आदिवासी विकास विभागाचा निधी अन्य विभागाकडे वळवू नये. राज्य सरकारने अनुसूचित जमाती कल्याण निधीतून कोट्यावधी निधी वळविण्याकरिता काढलेल्या परिपत्रकाच्या विरोधात यापूर्वी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते.आदिवासी विकास विभागाच्या योजनांची एकीकडे अमलबजावणी जाणीवपूर्वक रोखून ठेवत दुसरीकडे मात्र त्यांच्या विकासासाठी असलेला उपाययोजनेचा निधी इतर ठिकाणी वळवून आदिवासी समाजाला विकासापासून वंचित ठेवले जात आहे.
आदिवासी समजाचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कडून कोट्यावधीचा निधी हा आदिवासी विकास विभागाला दरवर्षी प्राप्त होत असतो मात्र सदर निधी हा आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी बीजमंडळ जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वळविला जात असतो, मात्र पुढे त्या निधीचे काय होते ? तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही, त्याचा पाठपुरावा होत नाही कि, त्या त्या विभागाचे अधिकारी आढावा आदिवासी विकास विभाग कार्यालयास सादर करीत नाहीत
त्यामुळे सबंधित विभागाकडे वळविला जाणारा निधी हा तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा तसे न झाल्यास एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अँड गणणत पाडवी नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, तळोदा उपाध्यक्ष उमेश वसावे ,दिलवरसिंग दादा, , सुकलाल पवार बिजलालदादा आदी उपस्थित होते.








