नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील महसूल विभागात वडीलांचे मृत्यूपत्र बनावट असल्याचे माहिती असूनही महसूली दप्तरात नोंद करुन खरा दस्त असल्याचा वापर करुन विश्वासघात करुन फसवणूक केल्याप्ररणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा येथील मयूर रविंद्र चौधरी यांचे वडीलांचे मृत्यूपत्र बनावट असल्याचे माहिती असून संदिप रविंद्र चौधरी याने सदर मृत्यूपत्र खरा असल्याचे दाखवून महसूली दप्तरात नोंद करुन बनावट मृत्यूपत्राचा वापर केला.
याबाबत मयूर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात संदिप चौधरी याच्याविरोधात भादंवि कलम ४२९, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, १९२, ४०६, १२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनश केदारे करीत आहेत.








