नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातून धुळे नागपूरकडे जाणारा प्लास्टिक ने भरलेला आयशर टेम्पो ( क्र. जी.जे.०३, बी. टी.५३०७ ) बर्डीपाडा फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या टोलनाकाच्या दरम्यान. वनवेने वाहनांची ये जा सुरू आहे. मात्र सदर टेम्पो सरळ मार्गाने जाताना रेती कपचीच्या ढिगार्यावर चढल्याने.चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन पलटी होत.भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान या वाहनातील प्लास्टिक मालही बाहेर फेकला गेल्याने. मालाचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विसरवाडी पोलीस व १०८ रुग्णवाहिकेला फोन करून तत्काळ टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढून. पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून.
याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने. दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.








