नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात सहाव्या दिवशी ७३ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. यामध्ये ६० सार्वजनिक, ८ खाजगी तर एक गाव एक गणपती असे ५ गणपती मंडळांचा समावेश आहे.दरम्यान नंदुरबार येथे ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.रात्री उशीरापर्यंत या मिरवणुका सुरूच होत्या.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा ८६० मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. यात ४२३ सार्वजनिक, ३३८ खाजगी व ९९ एक गाव एक गणपतींचा समावेश आहे.यामध्ये आठ टप्प्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. काल दि.५ रोजी जिल्हाभरात एकूण ७३ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला.
यामध्ये नंदुरबार शहर पोलिस ठाणेंतर्गत २८ सार्वजनिक व १ खाजगी, उपनगर पोलिस ठाणेंतर्गत १४ सार्वजनिक, १ खाजगी व १ एक गाव एक गणपती, नवापूर पोलिस ठाणेंतर्गत ५ खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसरवाडी पोलिस ठाणेंतर्गत २ सार्वजनिक, म्हसावद पोलिस ठाणेंतर्गत ४ एक गाव एक गणपती, तळोदा पोलिस ठाणेंतर्गत १६ सार्वजनिक तर एक खाजगी मंडळाकडून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. असे जिल्हाभरात ६० सार्वजनिक, ८ खाजगी तर ५ एक गाव एक गणपतींना निरोप देण्यात आला.दरम्यान नंदुरबार येथील प्रथम मानाचे शिवलाल सोनार गणेश मंडळतर्फे काढण्यात आलेली पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली.
नंदुरबार येथील गणपती विसर्जण मिरवणुका राज्यात प्रसिध्द आहेत.नंदुरबार शहरात ढोल ताषांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.रात्री उशीरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.दोन वर्षांनंतर मोठया जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत आहे.दरम्यान गणरायाच्या विसर्जनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात लावण्यात आला होता.








