नंदुरबार l
शिक्षकांविषयी लोकप्रतिनिधींनी आक्षेपार्ह वक्तव्य करणे ही बाब खेदाची आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेची सेवा करणे महत्त्वाचे असतांना आ.प्रशांत बंब यांनी शिक्षक हे शिकविणे सोडून राजकारण करतात, असे वक्तव्य केले असून त्यांना गुरुजींची ताकद दाखविण्यासाठीच राज्यातील सर्वच शिक्षक संघटना दि.17 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतील.
तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन त्या सोडविण्यासाठी नेहमी पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी केले. अधिवेशनात नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत केली असून अध्यक्षपदी सतिष पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
नंदुरबार येथील गिरीविहार वाडीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने त्रैवार्षिक खुले नंदुरबार जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, राज्य कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष संजय पोतदार, धुळे जिल्हाध्यक्ष गमन पाटील, सरचिटणीस शरद पाटील, धुळे जिल्हा नेते मनोहर शिंदे, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम काळे, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कमल पावरा, सरचिटणीस मिना पाटील, ग.स.बँकेचे माजी चेअरमन संजय कुवर, ग.स.बँकेचे संचालक जितेंद्र पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे, सरचिटणीस एस.एन.पाटील,
शिक्षक सेनेचे भरत सावंत, अखिल शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसले, राकेश आव्हाड, केेंदप्रमुख संघटनेचे तावडे, उमेश बेडसे, प्राथमिक शिक्षक संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील, सरचिटणीस संजय बागुल, जिल्हा नेते वसंतराव पाटील, राज्य उपाध्यक्ष किशोर पाटील, राज्य सहसचिव सतिष पाटील आदी उपस्थित होते.
रनाळे येथील जि.प.शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गितातून लक्ष वेधून घेतले. या खुले जिल्हास्तरीय अधिवेशनात प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडीअडचणी, समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत केली असून अध्यक्षपदी सतिष पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा सरचिटणीसपदी अमोल शिंदे, कोषाध्यक्षपदी संजय घडमोडे, कार्याध्यक्ष संजय बाविस्कर, राज्य सहसचिव प्रविण देवरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी आनंदराव करनकाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी उज्वला बेडसे,
जिल्हा नेतेपदी हंसराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शिक्षक दिनानिमित्त पुर्वसंध्येला आयोजित अधिवेशनात शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवुन गुणवत्तापुर्ण आदर्शदायी काम करणार्या शिक्षकांचा सन्मानपत्राने गौरव करण्यात आला. त्यात प्रविण मोतीलाल सोनवणे (नंदुरबार), जयश्री सानप (नवापूर), रामजी पाडवी (अक्कलकुवा), सोनल बोरसे (तळोदा), विराज चौरे (धडगाव), छगन रामोळे (शहादा) यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर राजेंद्र कौतिकराव बोरसे यांना विशेष दिव्यांग शिक्षक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व महिला शिक्षिका यांची विशेष उपस्थिती होती. या अधिवेशनाचे औचित्य साधुन पदवीधर शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष विजय खैरनार यांनी आपल्या पदाधिकार्यांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश केला असून त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल शिंदे, प्रविण देवरे तर प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. आभार वसंत पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह शशिकांत पाटील, मनोज पवार, विवेक विसपुते, भास्कर नेरे, भगवान बागुल, नारायण नांद्रे, अशोक भदाणे, गोविंद सोनवणे, उल्हास लांडगे, केदार जाधव, अनिल देसले, शशिकांत राऊत, दिपक वसावे, अनिल बेडसे, नरेंद्र पाटील, अनिल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.








