नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील बिजरीचा वाघबारीपाडा येथे नातेवाईकास जिवेठार केल्याच्या कारणावरुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत एकास लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील बिजरीचा वाघबारीपाडा येथील भरत खेमा वळवी यांनी शिवाजी खेमा वळवी यांच्या नातेवाईकास जिवेठार मारले. या कारणावरुन भरत वळवी यांच्या घरात अनधिकृपणे शिवाजी खेमा वळवी, गुलाब खेमा वळवी, दामा खेमा वळवी, रागा खेमा वळवी, सिमा खेमा वळवी, लालसिंग खेमा वळवी, किशवर शिवाजी वळवी, अनिल भरत वळवी, मालसिंग भरत वळवी सर्व रा.बिजरी ता.धडगाव यांनी लाठ्याकाठ्या घेवून शिवीगाळ केली.
तसेच तुम्ही अजून गावातून का गेले नाही आम्ही तुम्हाला राहू देणार नाही असे बोलत घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर फेकून घराची तोडफोड करुन नुकसान केले व जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत आशा रुमा तडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात ९ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दीपक वारुळे करीत आहेत.








