Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘माणगाव परिषद – १९२०’ माहितीपटाचा सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रिमियर

tdadmin by tdadmin
June 23, 2021
in Uncategorized
0
‘माणगाव परिषद – १९२०’ माहितीपटाचा सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रिमियर

नवी दिल्ली, दि. २३– माणगाव परिषदेच्या १०१ वर्षपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘माणगाव परिषद १९२०’ या माहितीपटाचा सामाजिक न्यायदिन या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनी (२६ जून) प्रिमियर होत आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवर या माहितीपटाच्या प्रिमियरचे थेट प्रसारण होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पटकथा…
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.आलोक जत्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीपटाची संहिता, पटकथा करण्यात आली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी न्यू पॅलेसमध्ये तीन दिवस शूटिंगसाठी परवानगी दिली होती. पुणे येथील रिडीफाईन कॉन्सेप्ट्स संस्थेने हा माहितीपट बनवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १९२० साली ही परिषद झाली होती. “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील”, असे सार्थ उद्गार राजर्षी शाहू महाराजांनी २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथील अस्पृश्य समाजाच्या परिषदेत काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक वृत्तपत्रातील मजकूर आणि ज्येष्ठ संशोधकांच्या साहित्यातील संदर्भावरून या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्राचा सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

Next Post

रिलायन्स Jio 5G फोनचे होणार लॉन्चिंग? काय असेल किंमत आणि ऑफर?

Next Post
रिलायन्स Jio 5G फोनचे होणार लॉन्चिंग? काय असेल किंमत आणि ऑफर?

रिलायन्स Jio 5G फोनचे होणार लॉन्चिंग? काय असेल किंमत आणि ऑफर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add