नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर बहुउद्धेशिय संस्था संचलीत फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरीक चंद्रकला मराठे व कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर चौधरी, सचिव मनोजकुमार चौधरी , सदस्य वैशाली चौधरी, प्रमुख मान्यवर अश्विनी पवार, सोनाली बोरसे, भावना जैन, रुपाली मराठे, सोनाली जैन, सारिका चौधरी, व शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथि व मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तिची व सरस्वती पूजन करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रास्तविक गोटूसिंग वळवी यांच्याद्वारे करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाच्या पोशाख परिधान करुन वेगवेगळ्या नृत्याने आपले कलाविष्कार सादर केले. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी सुरेखपणे राधा कृष्णा च्या रूपाने नृत्य करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्यही केले यासाठी शिक्षिका नुरेन मकरानी व राजेश्वरी वळवी यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमावेळी रुपाली मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत चिमूकल्या विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतूक केले. कार्यक्रमाअंती सर्वांचा आवडीचा म्हणजेच दहीहंडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यात सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेत दहीहंडी फोडण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्हाईस प्रिंसिपल नीलेश गोसावी शिक्षक नीलेश भावसार, शकुंतला पाडवी, चिराग गावीत, विशाल गावीत, ईश्वर वसावे, राजेश्वरी वळवी, योगेश वळवी, अमीनाबेन वसावा, विलास वसावे, जयाबाई पाडवी, छाया राठोड यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नुरेन मकरानी यांनी केले तर आभार कृष्णा नाईक यांनी मानले.