नंदूरबार l प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या वेलेट फिल्म फेस्टीवलमध्ये डॉ. सुजित पाटील दिग्दर्शित बटरफ्लाय या लघू हिंदी चित्रपटाला आठ नामांकन व अंतिम फेरीत चार ॲवार्ड घोषीत झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आता पर्यंत २७ ॲवार्ड मिळाले आहेत.
बंगाल मध्ये पार पडलेल्या वेलेट फिल्म फेस्टीवलमध्ये बेस्ट ॲक्टरचा ॲवार्ड पत्रकार , कलाकार रणजितसिंग राजपूत यांना घाेषीत झाला असून त्यांना नुकताच अवॉर्ड प्रदान करण्यात आला.तसेच नैनिताल येथे प्रसिध्द दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निर्मल पांडेय स्मृती फिल्म फेस्टीवलमध्ये देखील बटरफ्लाय या लघू हिंदी चित्रपटाला स्पेशल मेंशन ॲवार्ड घोषीत झाला आहे.
पश्चिम बंगाल,मुंबई,कोलकोता, औरंगाबाद, नैनिताल, ग्वालियर या सर्वच शहरांमध्ये बटरफ्लायने आपला विजयाचा झेंडा रोवला आहे. बंगालमध्ये पार पडलेल्या फिल्म फेस्टीवलमध्ये तब्बल ७ हजार १०२ चित्रपटांचा सहभाग होता. यात चार ॲवार्ड मिळाल्याने दिग्दर्शक डॉ सुजित पाटील,निर्माते तथा चित्रपटातील अभिनेते डॉ. राजकुमार पाटील व अभिनेता रणजित राजपूत यांचे सर्वस्तरावर कौतूक होत आहे. याच चित्रपटातील बाल कलाकार प्रशंसा निलेश तवर हिला देखील बेस्ट चाईल्ड आर्टिस्टचा ॲवार्ड या आधीच मिळाला आहे. बेस्ट शॉर्ट फिल्म, बेस्ट सिनेमा फोटोग्राफी,बेस्ट प्रोडयूसर,बेस्ट स्टोरी,बेस्ट डायरेक्टर असे एकाहून एक ॲवार्ड मिळत असल्याने संपुर्ण बटरफ्लाय टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.
डॉ राजकुमार पाटील व डॉ सुजित पाटील यांनी अभिनेता रणजित राजपूत यांच्या निवास स्थानी जावून सत्कार केला. यावेळी राजपूत भावूक झाले होते. ॲवार्ड मिळाल्याने बॉलीवूडचा मार्ग काहीसा सुकर झाल्याचे राजपूत म्हणाले.








