मुंबई l प्रतिनिधी
आज सकाळी सकाळी महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे . शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे . ते आज बैठकीसाठी मुंबईला येत होते .
त्यावेळेस मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील भातान बोगद्याजवळ हा अपघात झाला . या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . मात्र , तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले . आज दुपारी मुख्यमंत्र्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी बीडहून मुंबईला येत होते .
अपघात एवढा भीषण होता, की मेटे बसलेली डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. अपघाताचे वृत्त समजताच भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पोहोचले आहेत. मेटे यांची कार बीडकडून मुंबईकडे येत होते.








