Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयातर्फे भव्य तिरंगा रॅली

team by team
August 14, 2022
in शैक्षणिक
0
पूज्य साने गुरुजी महाविद्यालयातर्फे भव्य तिरंगा रॅली

शहादा l प्रतिनिधी

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करण्याचा अनुषंगाने शनिवार दि.13 रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.

दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभर ‘ हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे.पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या सहयोगाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या ‘स्टेच्यु ऑफ मोटीवेशनल पॉवर’ येथून नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या सौ. कांचनताई पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या विषयावर पथनाट्य सादर केले. प्रसंगी मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील,सौ. माधवीताई पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालय प्रवेशद्वारापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,शहादा मार्गे मलोणी रॅलीचे मार्गक्रमण होते. त्यात सुमारे 750 हुन जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्वयंसेवक, छात्र, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

विशेष म्हणजे सातपुडा शाळेतील छात्र व शिक्षकांनी सुद्धा उस्फुर्त सहभाग नोंदवला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या संविधान-अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव या विषयावरील पथनाट्य सादरीकरणाने रॅलीची सांगता झाली.रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

उपप्राचार्य डॉ.एस.डी.शिंदखेडकर, डॉ.एम.के.पटेल, उपप्राचार्या प्रा. कल्पना पाटील, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख लेफ्ट. एस.एल.भालेराव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मृणाल जोगी, क्रीडा विभाग संचालक डॉ. अरविंद कांबळे आदिंनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथे भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एस. ए .मिशन हायस्कूल येथे देशभक्तीवर नृत्य

Next Post
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एस. ए .मिशन हायस्कूल येथे देशभक्तीवर नृत्य

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एस. ए .मिशन हायस्कूल येथे देशभक्तीवर नृत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add