बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तमाम भाजपा लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत बाईक रॅलीचे आयोजन केले .
तळोदा तालुका भाजपच्या वतीने तळोदा तालुक्यातील सर्वात मोठे गावं म्हणून परिचित असलेल्या बोरद गावात भारताच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरद येथे मोटार सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तळोदा तालुक्यातील पदाधिकारी , लोकप्रतिनिधी,तसेच भाजपाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते.
या रॅलीत आ.राजेश पाडवी,राजेंद्र गावीत, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सरचिटणीस डॉ.शशिकांत वाणी ,सतीश वळवी,किसान मोर्चाचे प्रविणसिंग गिरासे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या बाईक रॅलीला साईबाबा मंदिरापासून सुरुवात झाली त्यानंतर ही रॅली बोरद गावातील प्रत्येक गल्ली त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ या रस्त्याने भारताचा जयघोष करत निघाली व शेवटी या रॅलीची सांगता साईबाबा मंदिराजवळ करण्यात आली.
या रॅलीत अनेक भाजपा कार्यकर्त्यांसह गावातील मुस्लिम बांधवांनीही आपली उपस्थिती दर्शवली.
या रॅलीच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, आमदार राजेश पाडवी,भाजपा सदस्य,राजू गावित, नगराध्यक्ष,अजय परदेसी,भाजपा प्रदेश सदस्य डाँ शशिकांत वाणी,प्रभारी नारायण ठाकरे,पं स सदस्य विजय राणा, प्रकाश वळवी,मालदा सरपंच गोपी पावरा,प्रविणसिंह राजपूत,सतिष वळवी,दरबारसिंग पाडवी, जि.प.सदस्या संगीता पवार,भरत पवार,दारासिंग ठाकरे,चेतन गोसावी,मंगेश पाटिल,साजन शेवाळे,रविन भिलाव,गौतम भिलाव,विनोद शेवाळे,शोटू वरसाळे,महेंद्र पवार,कांतीलाल पाडवी आदी उपस्थीत होते








