तळोदा l प्रतिनिधी
आपले पुनर्वसन होण्या आधी आपण ज्या निसर्ग रम्य वातावरण जगलो आणि असंख्य औषधी वनस्पतींच्या दैनंदिन वापरात वाढलो त्याची आठवण करून तरी, जर जास्तीत जास्त सर्व प्रकारची वृक्ष लागवड केली, तर आर्थिक दृष्टया सक्षम होणारच परंतू आरोग्य समस्या देखील कमी होईल त्यामुळे किमान निसर्ग आपल्याला जगवतो या भावनेने तरी निसर्गाची कृतज्ञता म्हणून तरी झाडे लावली पाहिजेच मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी व्यक्त केले.
जीवननगर (पुनर्वसन) ता.शहादा येथे जीवननगर ग्रामपंचायत व जिल्हा रूग्णालयात, नंदुरबार च्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, प.स.सदस्य निमा पटले, डाॅ.रमा वाडेकर, डाॅ.जितेंद्र पावरा, प.स.सदस्य सत्यम वळवी, शांतीलाल पाटील, ओरसिंग पटले डाॅ. नितीन राठोड, डाॅ. राहून अहिरे, किशोर पाटील, ग्रा.प.स.किरसिंग वसावे, रामभाई चौधरी पोलीस पाटील दिनेश पावरा, माजी पो.पा.मालसिंग पावरा,
शिलदार पावरा, अमित पावरा, गोरजी पावरा, संदिप वळवी , ग्रामसेवक हरिचंद्र खसावद, समसीबाई पावरा, बायसिंग पावरा, सरदार पावरा आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी ज्या समाजाची व्यवहारीक जीवनात दाता म्हणून ओळख आहे तोच समाज बांधव आपल्या रक्त नात्यातील एखाद्याला जेव्हा तात्काळ रक्ताची गरज असते त्यावेळीची रक्तदानाबाबत त्याची उदासीनता किंवा आजपर्यंत असलेला गैरसमज चिंताजनक असून रक्तदान सारखे कोणतेच श्रेष्ठ दान नसून प्रत्येकाने जीवनदाता म्हणून पुढे यावे, कारण जिल्हा रूग्णालयात रक्ताचा खुप मोठा तुटवडा असून आपण सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून केलेल्या रक्तदानाने आपण कोणा समाज बांधवांचा जीव वाचवू शकतो असल्याचे मत व्यक्त केले.
शिबिर यशस्वीतेसाठी नरेंद्र वसावे, सायका पावरा, रविंद्र पावरा, विक्रम वसावे, खात्र्या पावरा आदींनी परिश्रम घेतले.








