नंदुरबार ! प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील पांढरामातीचा जांभीपाणीपाडा येथे गुरे चारण्यासाठी पैसे मागितल्याचा राग येवून कुऱ्हाडीने हल्ला करत एकाला ठार मारल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील पांढरामातीचा जांभीपाणीपाडा येथे रंजित हाना वसावे याने सुंडया टुक्या वसावे याच्याकडे गुरे चारण्यासाठी पैसे मागितले.याचा राग येऊन सुंड्या वसावे याने रंजीत वर धारधार कुऱ्हाडीने कपाळावर मध्यभागी जोरात मारले या हल्ल्यात रंजित हाना वसावे (२८) रा . पांढरामातीचा जांभापाणीपाडा ता . अ.कुवा याचा मृत्यू झाला.याप्रकरणी आंबीबाई रंजित वसावे रा . पांढरामातीचा जांभीपाणीपाडा ता . अ.कुवा यांच्या फिर्यादीवरून सुंडया टुक्या वसावे रा . पांढरामातीचा जांभीपाडाणीपाडा अ.कुवा याच्याविरुद्ध भा. द.वी.कलम ३०२ प्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनी.धनराज निळ करीत आहेत.