नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जानताराजा चौक येथील दुकानासमोरून अज्ञात चोरटयाने किरण शामराव कासार यांची ३५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एम.एच.३१- एस. ८६५७) लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी किरण शांताराम कासार रा.कासारगल्ली काका गणपतीशेजारी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास शिवाजी वरसाळे करीत आहेत.