नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील कोकणीहिल परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद पार्क येथून चोरट्याने दुचाकी लंपास केली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील धनीकलाल मगन कोकणी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.४५ क्यू ४०२८) स्वामी विवेकानंद पार्क येथून चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत धनीकलाल कोकणी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मन्साराम गवळी करीत आहेत.