नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील लहान शहादा येथे वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील राहूल संजय ठाकरे हा त्याच्या मित्राची दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एश ३३८०) सलमान (पूर्ण नाव माहित नाही) याला बसवून कोळदा येथून बोरद येथे जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.डी.एन. एम २८११) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन लहान शहादा गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात राहूल ठाकरे व त्याचा मित्र सलमान यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत राहूल ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मधुकर येलवे करीत आहेत.