Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिंचपाड्यात दोन गटात मारहाण पाच जण जखमी ; परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरुद्ध गुन्हा

team by team
August 6, 2022
in क्राईम
0
नंदुरबार येथे दोन गटात मारहाण, ३० जणांविरूध्द गुन्हा, दोघांना झाली दुखापत

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे जुन्या घराच्या वादातून दोन गटात मारहाण झाली. यात दोन्ही गटातील पाच जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील सुजाता फुलसिंग वसावे व भुपेंद्र रमेश गावित यांच्यात जुन्या घराचा वाद होता. या वादातून भुपेंद्र रमेश गावित, मनिषा भुपेंद्र गावित, विवेक रमेश गावित, अमित किशोर गावित, हर्षल मनोज वळवी, दीपकचंद्र सुरेश चौर, आकाश नारायाण मेना, दीपक कोकणी (सर्व रा.चिंचपाडा) यांनी सुजाता वसावे वसावे यांच्या घराजा दरवाजा उघडून जिन्यातून छतावर चढून सुजाता वसावे व त्यांचा मुलगा नितलसिंग फुलसिंग वसावे यांना मारहाण करीत तलवारीने जिवेठार मारण्याची धमकी दिली.

तसेच सुजाता वसावे यांच्या वहिणी सुरेखाबाई श्रीराम गावित यांना हाताबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत सुजाता वसावे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.

 

तर दुसऱ्या गटातर्फे मनिषा भूपेंद्र गावित यांनी फिर्याद दिली. जुन्या घराच्या वादातून श्रीराम नारायण गावित, सुरेखाबाई श्रीराम गावित, सुजाताबाई फुलसिंग वसावे, नितलसिंग फुलसिंग वसावे व रमेश मकन धोडीया यांनी मनिषा गावित यांचे पती भुपेंद्र व दीर विवेग गावित यांना काठीने व हाताबुक्यांनी मारहाण केली.

 

तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मनिषा गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १३४, १४७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा महाविद्यालयात आज बांबुंच्या वस्तूंचे प्रदर्शन

Next Post

चोरीच्या दोन दुचाकी बाळगल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

चोरीच्या दोन दुचाकी बाळगल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add