नंदूरबार l प्रतिनिधी
50 लाखांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीला न्यायालयाने 1 वर्ष करावसाची शिक्षा व 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीमती विमल बाबुलाल राठोड रा. नागसर नगर ता.जि.नंदुरबार यांचा दिनांक 18 जून 2018 रोजी अजनाड़ बंगाला ता. शिरपुर जि. धुळे येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या बाबुलाल दरबार राठोड यांचेशी झाला होता.
लग्नानंतर काही दिवसानंतर बाबुलाल राठोड यांनी श्रीमती विमल राठोड यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारिरिक व मानसिक छळ करून जिवेठार मारण्याची धमकी देत होते तसेच प्लॅट घेण्यासाठी माहेरुन 50 लाख ची मागणी करु लागले म्हणून श्रीमती विमल बुलाल राठोड रा. नागसर नगर ता. जि. नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 498(अ). 323,504, 506.34 प्रमाणे दि. 15 जून 2019 रोजी बाबुलाल राठोड व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदूरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार साहेबराव चौरे यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केल होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी बाबुलाल राठोड व कुटुंबातील इतर सदस्यांविरुध्द दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार विनोद चव्हाण यांचे न्यायालयात सादर केले होते.
मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष यासर्व बाबीचा विचार करून मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवून खटल्याची सुनावणी पुर्ण करुन आरोपी बाबुलाल दरबार राठोड रा. अंजना बंगला ता. शिरपुर जि. धुळे यास दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी 1 वर्ष साधा कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच 5 हजार रुपये न भरल्यास 3 महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधक्षक विजय पवार, उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार साहेबराव चौधरी यांनी केला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. सुनिल पाडवी यांनी पाहिलेल होते.
पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार पंकज बिरारे यांनी कामकाज केले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे.








