शहादा । प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहादा शहर प्रभारी अध्यक्षपदी जि.प.सदस्या हेमलता शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
शहादा शहर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच राजीनामा दिला. शहादा नगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाहता पक्षाने तात्काळ रिक्त पद भरले.
पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शहरातील सर्व प्रभागासाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी सुयोग्य अशा उमेदवारांची निवडणूक प्रभारी व जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे योग्य वेळी मान्यतेसाठी सादर करण्याचे पत्रात म्हटले आहे.
हेमलता शितोळे यांच्या निवडीबद्दल काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.








