नंदुरबार l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील शेलकुई येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांना रेशन परवाना मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, शेलकुई ता. धडगांव येथील रेशन कार्ड लाभार्थी व गावकरी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत स्वस्त धान्य दुकानांचे परवाना बाबत जाहिरनामा निघालेला आहे. तरी आम्ही ग्रामस्थ व लाभार्थी मिळुन तसेच गावातील पोलिस पाटील तसेच सावित्रीबाई फुले महिला बचत गट शेलकुवी, कारभारी पाडा ग्रामस्थ यांनी मिळून चर्चा केली असता, सावित्रीबाई फुले महिला बचत गट शेलकुवी या गटास प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.
तसेच सावित्रीबाई फुले महिला बचत गट या गटाला स्वस्त धान्य दुकानांचे परवाना मिळावा ही सर्व रेशनकार्ड धारकांची विनंती आहे. या गटाव्यतिरिक्त आमची दुसर्या गटाला सहमती नाही असे आम्ही गावातील प्रमुख तसेच ग्रामस्थ व लाभार्थी मिळून सर्वानुमते गावांचा ठराव पारित करण्यात आला तरी दि.२२ जुलै रोजी तहसिल कार्यालय धडगाव येथे लाभार्थीच्या वतीने सावित्रीबाई फुले महिला बचत गट शेलकुवी यांची निवड करण्यासाठी लाभार्थीच्या वतीने तहसिल कार्यालय धडगाव यांच्याकडे निवेदन देण्यात आले .
तरी बचत गटाचे निवड करण्याचे अधिकार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे असल्याचे सांगीतल्याने सावित्रीबाई फुले महिला बचत गट शेलकुवी यांची निवड करण्यात यावी या मागणीसाठी गावकर्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी पिंट्या पावरा राजेश पावरा, सायसिंग भोमता पावरा, पंकज विठल पावरा आदी उपस्थित होते.