Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कारागृहातून रजेवर आलेल्या 2 फरार कैदींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

team by team
August 4, 2022
in क्राईम
0
जिल्ह्यातील पॅरोलवरील पाच कैदी फरारच, शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान

नंदूरबार l प्रतिनिधी

 

कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे सावट पसरले होते . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने देखील कारागृहातील कैद्यांना पॅरोल रजेवर सोडण्याचा निर्णय घेतलेला होता . कालांतराने कोरोनाचे संकंट हळुहळु दुर झाल्याने पॅरोल रजेवर सोडलेल्या कैद्यांना मुदतीत कारागृहात हजर होणे बंधनकारक होते .

 

परंतु शासनाने कैद्यांच्या बाबतीत दाखविलेली सहानुभुतीचा काही कैद्यांनी गैरफायदा घेत मुदतीत संबंधीत कारागृहात परत न जाता फरार झाले होते . म्हणून अशा फरार कैद्यांविरुध्द् कारागृह विभागाकडून कडक कारवाई करत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व सारंगखेडा येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत कारागृहातून पॅरोल रजेवर आलेले परंतु कारागृहात परत न गेलेले फरार असलेल्या आरोपीतांचा आढावा घेतला असता ,

 

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत असे आरोपी असल्याचे निदर्शनास आल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी अशा फरार कैद्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारयदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले . दि. 3 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,

 

 

शहादा तालुक्यातील धांद्रे येथील शिवा चित्ते यास नाशिक कारागृह येथून कोविड रजेवर सोडले होते परंतु शिवा चित्ते हा कारागृहात परत न जाता धांद्रे येथील त्याच्या शेतात लपून बसलेला आहे त्याबाबत शहादा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

 

पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदरची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला सांगून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ कारागृहातून बेकायदेशीररीत्या फरार असलेल्या कैद्यास ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा तालुक्यातील धांद्रे गावातील शिवा चित्ते यांच्याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करुन त्याच्या शेताचा ठावठिकाणा शोधून काढला व शिवा तारसिंग चित्ते रा . धांद्रे ता . शहादा यास शिताफीने ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाईकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे .

 

त्याचप्रकारे सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बामखेडा गावातील विजय विठ्ठल महाले यास देखील कारागृहातून कोविड रजेवर सोडण्यात आले होते परंतु विजय महाले हा कैदी देखील कारागृहात परत न गेल्याने त्याच्या सारंगखेडा पोलीस ठाण्यात भा.द.वि. 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर फरार कैदी बाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्याने त्यास दि. 3 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईकामी सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे .

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , स्थानिक गुन्हे शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार , विकास कापुरे पोलीस कॉन्सटेबल विजय ढिवरे , किरण मोरे यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

शालेय पोषण आहाराच्या लेखापरीक्षणास स्थगिती देण्याचे शिक्षण सचिवांचे शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासन

Next Post

शेलकुई ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next Post
शेलकुई ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शेलकुई ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add