नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्री.जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघ नंदुरबार संचलित जैन अलर्ट गृप ऑफ नंदुरबार आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ जुलै रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून दि.२४ जुलै २०२२ रविवार रोजी येथील भैरव भुवन, गणपती मंदिरामागे सकाळी साडेदहा ते दुपारी ४ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, सचिव किरण दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन विक्की जैन यांनी केले आहे.








