नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु कॉलेजचा विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल सी . बी . एस . सी . बोर्ड द्वारे आजच जाहिर करण्यात आला . त्यामध्ये विज्ञान शाखेतुन अनस फारुक कुरेशी याने ९६.४० टक्के गुण मिळवत जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला तसेच वाणिज्य शाखेतुन कुमारी मानसी शर्मा हिने ९ ०.२० टक्के गुण मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले.

संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणी , व्हाइस चेअरमन सिध्दार्थ वाणी , शाळेचे प्राचार्य छाया शर्मा यांनी विदयार्थांचे व पालकांचे अभिनंदन व कौतुक केले . शाळा नेहमी विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करुन शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य पुरविते , उच्चशिक्षित तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनातुन विद्यार्थी उंच भरारी घेत असतात . गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच शाळेचे ब्रिदवाक्य आहे .
सदर विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेत हे सार्थक करुन दाखवले . शाळेतुन विज्ञान शाखेत कुमार संकेत पाटील यास ८७.६० टक्के गुण प्राप्त करत द्वितीय क्र . प्राप्त केले . तृतीय क्र . संस्कुती पाटील ८२.२० टक्के हिला मिळाले .
अनुक्रमे नेहा पाटील ७९ .४० टक्के व कृणाल राजपुत ७८.६० टक्के प्राप्त केले . वाणिज्य शाखेतुन शाळेत द्वितीय क्र . श्रेया चित्तोडकर ९०.२० टक्के हिला मिळाले हि विद्यार्थीनी के . आर . पब्लिक स्कुल हॉस्टेलला राहणारी छात्रा आहे . अनुक्रमे मितेश शर्मा ८६.४० टक्के तुषार मराठे ८२.२० टक्के तर सौम्या भारद्वाज ८१.२० टक्के हिला मिळाले .








