नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर शहरातील अमन पार्क परिसरामध्ये शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मारुती व्हॅन जळून खाक झाली .
या आगीची झळ शेजारील घराला बसल्याने या घरातील विजेचे उपकरणे जळली . तसेच रसूल पठाण यांच्या घराची खिडकी व गॅलरीचे काच फुटले . अमन पार्कमध्ये मारुती ओम्नी व्हॅन सुरू करण्यासाठी डबल बॅटरी लावून प्रयत्न सुरू होता . त्या वेळी अचानक स्पार्किंग होऊन कारला आग लागल्याने व्हॅन जळून खाक झाली . आगीत मारुती ओम्नी व्हॅनचे प्रचंड नुकसान झाले . नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला . त्यानंतर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी आला . एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले . घटनेनंतर अमन पार्कमधील वीजपुरवठा खंडित झाला होता .