नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावाच्या शिवारात झाडाला दोरखंड लावून ४२ ते ४५ वर्षे
वयोगटातील एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.मयताबाबत माहिती देवून शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी होळ मोहिदा शिवारात पिंपळाच्या झाडाला एकाने दोरखंड बांधून गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.
आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. शेतात मात्र त्याच्यासोबत (एमएच ३९ जी ६२८१) ही दुचाकी आढळून आली आहे. मयताची ओळख पटली नसून याबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.