नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे २०जुलै जागतिक बुद्धिबळ दिवसानिमित्त इयत्ता ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे पर्यवेक्षक पंकज पाठक, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले राहुल खेडकर,मुख्याध्यापक नारायण भदाणे, पर्यवेक्षक विपुल दिवाण,क्रीडा प्रमुख जगदीश बच्छाव आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतातून बुद्धिबळ खेळाने कशाप्रकारे आपल्या मेंदूचा व्यायाम,एकाग्रता वाढते हे स्पष्ट केले तसेच अध्यक्षीय भाषणात पंकज पाठक शारीरिक विकासाबरोबर बौद्धिक विकास होणे फार गरजेचे आहे या बुद्धिबळ खेळाने एकाग्रता, तर्क,आत्मविश्वास व खेळाडूवृत्ती निर्माण होते असे मनोगतातून स्पष्ट केले.
सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.या स्पर्धेत इयत्ता ५वी ते १०वी तील एकूण 131 विध्यार्थी सहभागी झाले.
५वी ते६वी गटात
प्रथम – उमेश चित्रकथे ६वी अ
द्वितीय -वैभव गावित ६ वी ड
तृतीय- तन्मय कोकणी ६ ब
चतुर्थ- आर्या वसईकर ५वी ड
पंचम- नैतिक बागल ६अ
७वी, ८वी गटात
प्रथम -दुर्गेश पाटील ७क
द्वितीय – दिपक पवार ७ब
तृतीय – देवदत्त चौरे ८ड
चतुर्थ – सनी सूर्वांडे ८ड
पंचम – निलेश बोरसे ८क
९वी, १०वी गटात
प्रथम – सुमित पिंपळे ९ड
द्वितीय – अविष्कार गावित १० क
तृतीय- नचिकेत सोनार ९ड
चतुर्थ – स्मित गावित १०ड
पंचम – धीरज नांदुरकर ९ड या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मिलिंद चव्हाण तर आभार निलेश गावित यांनी मानले.
क्रीडा शिक्षक अशोक वसईकर,घनश्याम लांबोळे, तुषार नांद्रे, शिवाजी चौधरी,प्रवीण शिवदे, देवेंद्र कुलकर्णी, विशाल मच्छले,प्रशांत पाटील,जयेश देवरे, प्रणव सूर्यवंशी, सागर महाजन, सौ. कमल चौरे, सौ. धनगौरी पाडवी,अशोक शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.