नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना वाढत असून आज दि.२० जुलै रोजी दिवसभरात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा आता कोरोना फैलावत आहे. आज दिवसभरात तब्बल २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील १३ जणांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे. तर ८ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१ इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक २४ व नवापूरातील ७ अशा एकूण ३१ जणांचा समावेश आहे. उर्वरित तालुके सध्या कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना वाढत असल्याने लसीकरण न केलेल्या नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.