Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अज्ञात माथेफिरुने तीन एकरातील पपई पिकाची केली कत्तल

team by team
August 14, 2021
in क्राईम
0
अज्ञात माथेफिरुने तीन एकरातील पपई पिकाची केली कत्तल

तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी भगवान लोहार व दिनेश लोहार शेतातील सुमारे तीन एकरातील उभ्या असलेल्या पपई पिकाची काठीच्या सहाय्याने एका अज्ञात माथेफिरुने, पपईचे ४०-५० झाडे कापल्याच्या घटनेने शेतकर्‍यांमध्ये हळहळ निर्माण होऊन घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सदरील घटना अशी की, गुरुवार रोजी शेतातील पिकाला दिवसभर पाणी देण्याचे काम चालू होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास शेतातील काम आपटून आपापल्या घरी निघून गेल्यावर रात्री व पहाटच्या सुमारास कुणीही शेतात नसल्याच्या अंदाज घेत एका अज्ञात माथेफिरुने, स्वतः जवळ असलेल्या काठीच्या सहाय्याने पिकाची नासधूस करत, ठिबक सिंचनाचे पाईप, व्हेंचुरीची तोडफोड केली. पपईच्या पिकाला अर्ध्यापासून मोडल्याचे शेतकरी यांच्या मार्फत सांगण्यात आले. पाच-सहा महिन्याच्या पपईच्या पिकाची अशा प्रकारे नासधूस झाल्यामुळे, हातातोंडाशी आलेला घास त्या माथेफिरूने हिसकावून घेतल्याने, परिसरात हळहळ निर्माण होऊन, संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत माहिती मिळताच तळोदा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे व कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. दरम्यान अज्ञात माथेफिरू विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरील शेतकर्‍याने मार्च महिन्यांत पपई पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्याच्या पपईला बर्‍यापैकी फळ व फुल्लर आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न निघाले असते. परंतु सदरील शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, हातातोंडाशी आलेला घास गेल्याने सदरील शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहे. तसेच ठिबक सिंचनाचे साहित्य, पाईपलाईन, व्हेंचुरी किटची सुद्धा तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अज्ञात माथेफिरूचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेऊन, दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार करावे-ॲड.के.सी.पाडवी

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add