Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात एकही शाळाबाह्य बालक नको जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

team by team
July 5, 2022
in राज्य
0
जिल्ह्यात एकही शाळाबाह्य बालक नको जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉप आउट या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेमध्ये सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्थानिक बालरक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या 23 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण जिल्हाभरात दिनांक 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉप आउट’ ही शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक गाव स्तरावरील अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व स्थानिक बालरक्षक या शोध मोहिमेत सहभागी होणार आहेत.

यादरम्यान 3 ते 18 वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यात येणार असून, एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, तालुका स्तरावर तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

शोध मोहिमेत शिक्षण विभागातील संपूर्ण यंत्रणा कार्यरत राहणार असून, सर्व पालकांनी या मोहिमेस सहकार्य करून मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील मिशन झितो ड्रॉपआऊट या शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,

जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे. ओ.भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, महिला व बालविकास अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. संदीप मुळे, विषय सहाय्यक देवेंद्र बोरसे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गौतन वाघ, समता विभागाचे महेंद्र अहिरे,

राजेश चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी निर्मल माळी, जिल्हा बालकामगार अधिकारी कार्यालयाचे शेळके जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी सोनवणे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात राबवावयच्या मिशन झिरो ड्रॉप आउट या मोहिमेंतर्गत कोणकोणत्या ठिकाणी सर्वेक्षण करावे याबरोबरच सर्वेक्षणात कोणकोणत्या यंत्रणेने कोणकोणती जबाबदारी पार पाडावी, याविषयी चर्चा करून केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवरील विविध समित्यांची रचना करून जबाबदारी वाटप करण्यात आल्या.

सुरुवातीला प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांनी २३ जूनच्या शासन परिपत्रकाचे वाचन करून मोहिमेबाबत माहिती दिली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर यांनी मोहिम राबविताना ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतच्या सर्व यंत्रणेने आपण करत असलेल्या कामाला व्यापक प्रसिद्धी देण्याचे आवाहन करत गावात प्रत्येक नागरिकाला या मोहिमेची माहिती मिळण्यासाठी दवंडी व इतर तत्सम माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.

महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कृष्णा राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक या मोहिमेत सहभागी होऊन शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी व मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती दिली.

तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्येक तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गाव पातळीवरील बालरक्षकांकडून मोहिमेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी व ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.

तसेच जिल्ह्यातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देऊन एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी मिशन झिरो ड्रॉप आउट ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करत, यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधिनी सजकार्य करावे असे आवाहन करत महसूल व शिक्षण विभागातील यंत्रणेला वाटून दिलेले काम जबाबदारीने पार पाडले पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी अध्यक्षीय समारोप करताना दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत निघाली जगन्नाथ रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थीती

Next Post

आनंदाची बातमी : नर्मदा काठच्या विद्यार्थ्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेद्वारे नियुक्ती

Next Post
आनंदाची बातमी : नर्मदा काठच्या विद्यार्थ्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेद्वारे नियुक्ती

आनंदाची बातमी : नर्मदा काठच्या विद्यार्थ्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेद्वारे नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add