Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत निघाली जगन्नाथ रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थीती

team by team
July 5, 2022
in राज्य
0
अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत निघाली जगन्नाथ रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थीती

नंदुरबार | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या इस्कॉनतर्फे आज दि.५ जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

नंदनगरीत प्रथमच जगन्नाथ रथयात्रा निघाली यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होतेे. हरे रामा हरे कृष्णाचा जयघोषात हजारो भाविक सहभागी झाले होते.

इस्कॉन तर्फे अहमदाबाद, पुरी या सारख्या मोठ्या शहरांमध्ये जगन्नाथ रथयात्रा दरवर्षी काढण्यात येते त्याच धर्तीवर नंदुरबारात दि. ५ जुलैला कृष्णभावनामृत संघाचे संस्थापक कृष्ण कृपामूर्ति श्रीमद् ए.सी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या प्रेरणेने भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होतेे.
शहरातील मोठा मारुती मंदिरापासून सुरू झालेले आहे या रथयात्रेत हरे रामा हरे कृष्णाचा जयघोष करीत भाविक तल्लीन झाले होते. टाळ मृदुंगाच्या जयघोषात रथ ओढण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. सर्वप्रथम रथाची पूजा केली.त्यानंतर रथ ओढून शोभायात्रेस प्रारंभ केला.

मोठा मारुती मंदिरापासून निघालेली रथयात्रा सोनी विहीर, शक्तिसागर चौक, भक्तीधाम मंदिर, दादा गणपती, शिवाजी रोड, चैतन्य चौक, जळका बाजार, टिळक रोड, सोनार खुंट ,बालाजी वाडा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, गांधी पुतळा मार्गे नेहरू चौकातून पोलीस कवायत मैदानावर यात्रा पोहोचली.

या ठिकाणी सत्संगानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दरम्यान जगन्नाथ रथयात्रा मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत करून सहकार्य केले.

इस्कॉन तर्फे दरवर्षी भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येते. अहमदाबाद, पुरी यांसारख्या मोठ्या शहरानंतर प्रथमच नंदनगरीत यात्रेचे आयोजन केले होते ३ जुलैला सुरतहून नंदुरबारात रथाचे आगमन झाले. रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे व्वा : नंदुरबार जिल्ह्यातील 44 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध, 1 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

जिल्ह्यात एकही शाळाबाह्य बालक नको जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post
जिल्ह्यात एकही शाळाबाह्य बालक नको जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

जिल्ह्यात एकही शाळाबाह्य बालक नको जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add