Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

team by team
July 3, 2022
in राज्य
0
सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
देव मोगरा पुनर्वसन येथील मशरूम युनिटला सामाजिक कार्यकर्त्या व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हिरा विलास पाडवी यांनी भेट देऊन मशरुम शेतीची पाहणी करुन महिलांना प्रोत्साहन दिले.दरम्यान सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी आहे.

या भेटीत मशरूम शेतीच्या महिला मार्गदर्शक लीला वसावे व कीर्ताबाई वसावे यांनी हिरा पाडवी यांना मशरूम शेतीची माहिती दिली.तसेच सातपुड्यातील महिलांना घरच्या घरी आपले दैनंदिन काम सांभाळून करता येण्यासारखा एक चांगला व जास्तीत जास्त रोजगार तसेच फायदेशीर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले.

त्यामुळे हिरा पाडवी यांनी शासकीय अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेत्यांनी अशा ठिकाणी भेट देवुन व्यावसायिक व व्यवसायला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले सोबत येथील मशरूम व काळा तांदुळ आपण अमेरिकेत स्थायिक असलेल्या आपल्या मुलीला पाठवणार असल्याचे सांगितले.

यावेळी मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सातपुड्यात वाढत असलेल्या मशरूम व्यवसायाची माहीती दिली.तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांना स्व विकासासाठी सहाय्यता उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी पुनर्वसन येथील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.त्यामुळे महिला घेत असलेल्या पुढाकाराचे हिरा पाडवी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

November 28, 2026
एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

November 28, 2026
एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

November 28, 2026
डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

November 28, 2026
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

November 28, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

November 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add