Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हृयात मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा सिनेमा हॉल्स, नाट्यगृह व धार्मिक स्थळे बंद: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

Mahesh Patil by Mahesh Patil
August 13, 2021
in राज्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

नंदुरबार | प्रतिनिधी

शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन १५ ऑगस्ट पासून जिल्ह्यातील उपहारगृह, दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योगसेंटर, सलून, इनडोअर स्पोटर्स व आस्थापना सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास मूभा देण्यात आली आहे. परंतू उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करतांना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृहात आस्थापनांनी लावणे आवश्यक असेल. उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. ज्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह व बारमध्ये काम करुन शकतील. यासर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
वातानुकूलित उपहारगृह ,बार असल्यास वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक असेल. प्रसाधनगृहात उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील. उपहारगृह, बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी.उपहारगृह व बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक राहील. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जासत रात्री ९ वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.
सर्व व्यापारी दुकाने, शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. वातानुकीत तसेच विना वातानूकूलीत जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योगसेंटर, सलून-स्पा, केशकर्तनालय, ब्युटीपार्लर्स हे ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील. दुकाने,शॉपिंग मॉल्स, इनडोअर स्पोर्ट्स या ठिकाणी खेळाडू, तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. याठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळासाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत खेळण्यास मुभा असेल.
सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी ,बँक कम्रचारी ,रेल्वे व नगरपालिका कर्मचारी व व्यस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे. कर्मचार्‍यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण झालेले असलेल्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा असेल. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचार्‍यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. घरून काम करणे शक्य असलेल्या सर्व आस्थापनांच्या व्यवस्थपनांनी कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याची मुभा द्यावी. कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचार्‍यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशाप्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. खाजगी कार्यालयांना वेळेच व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालयचे २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल, मात्र सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे सर्व नियमित वेळेत सुरु राहतील.
खुल्या प्रांगणातील, लॉन किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण ,लॉन मध्ये होणार्‍या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील.विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकार्‍याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निर्बधांचे उल्लंघन करणार्‍यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई करण्यात येऊन संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येईल. मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन , भोजन व्यवस्थापन,बँडपथक, भटजी, छायाचित्रकार अशा विवाह व्यवस्थेशी संबंधितांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस झालेले असावे. त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.सर्व सिनेमा हॉल, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स (स्वतंत्र किंवा मॉल्स मधील ) सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे पुढील आदेश होईपावेतो बंद राहतील. आंतरराज्य प्रवासासाठी ज्या नागरिकाचे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील.वाढदिवस, संमेलन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, निवडणूका प्रचार सभा, रॅली, मिरवणूका, मोर्चे अशा गर्दी होणार्‍या कार्यक्रमांवर निर्बंध असेल.केंद्र शासन, राज्य शासनाने कोविड-१९ च्या योग्य वर्तणूकनुसार दिलेल्या चेहर्‍यावर योग्य प्रकारे मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार साबणाने धुणे, सॅनिटाईज करणे या मार्गदर्शक सूचनांचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. निर्बंधातून सुट देण्यात आलेली सर्व दुकाने, कार्यालय, औद्योगिक आस्थापना, शॉपिग सेंटर, मॉल, आणि उपहारगृहे, बार मालक, व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कामगार, कर्मचार्‍यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचार्‍यांची यादी, लसीकरणाची माहिती, प्रमाणपत्रासह तयार ठेवावी व सक्षम प्राधिकार्‍यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी.तसेच दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्स, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जतूकीरण व सॅनीटायझेशन, ग्राहकांचे तापमान घेण्याची तसेच मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट जमा करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची व व्यवस्थापनाची असेल.कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा

Next Post

रेशन दुकान परवानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

रेशन दुकान परवानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025
‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

April 28, 2025
भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

April 28, 2025
चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

April 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group