नंदुरबार | प्रतिनिधी
सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत उपजिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार व उपजिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प, तळोदा या कार्यालयासाठी इनोव्हा,एरटिगा, महिंद्रा स्कॉर्पियो या प्रकारातील प्रत्येकी १ वाहन वाहनचालकासह व विना इंधन मासिक भाडेतत्वावर लावण्यासाठी सीलबंद लिफाफ्यात दरपत्रक मागविण्यात आले आहे.
दरपत्रके दि.२३ ऑगस्ट २०२१ पर्यंत अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, नंदुरबार येथे सादर करावे असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी महेश सुधळकर यांनी कळविले आहे.