मुंबई l
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे भाजपाने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे , त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगा , अशी मागणी केल्यानंतर राज्यपालांनी देखील मुख्यमंत्री आणि विधान मंडळाला तसे पत्र दिले आहे . उद्या, 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे भाजपाने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे , त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगा , अशी मागणी केली. या सर्व राजकीय अस्थिरतेमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.
उद्या 30 जून रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणी घेण्याचे आदेशित केले आहे. हे अधिवेशन केवळ बहुमत चाचणीसाठी बोलवावे. कोणत्याही परिस्थितीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया संपवण्याचे स्पष्ट निर्देश कोश्यारी यांनी या पत्राद्वारे दिले
दरम्यान , काही अपक्ष आमदार आज दुपारी गुवाहाटीहून मुंबईला रवाना होत आहेत , असे एका आमदाराने सांगितले . त्यानंतर टप्प्या टप्प्याने शिवसेनेचे आमदारही दाखल होतील . काही आमदारांना आधी गोव्यात पाठविले जाणार असल्याचे बोलले जात आहे .
दरम्यान , सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवर निलंबन कारवाईला स्थगिती देत पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे . त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याची घाई नको म्हणुन महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे . सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली तर बहुमत चाचणी लांबू शकते .