नंदूरबार l प्रतिनिधी
एस. ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षक प्रसाद दीक्षित यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवुन त्यांचे मानवी जीवनात होणारे फायदे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी ही उत्स्फूर्तपणे योगासने केली.
शाळेच्या प्राचार्य नुतनवर्षा वळवी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयालयाच्या प्राध्यापिका नंदा वसावे, उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,पर्यवेक्षक मिनल वळवी आदी उपस्थित होते.